Join us

CoronaVirus News in Mumbai : कोरोनाबाधित तान्हुल्यावर मेंदूची शस्त्रक्रिया!, सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 06:00 IST

१३ मे रोजी कावीळ, सर्दी, ताप या लक्षणांमुळे बाळाला सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्याला रक्त चढवले गेले.

मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दीड महिन्यांच्या बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या ६ जणांच्या टीमला यश मिळाले आहे. हे बाळ काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्याने संसर्गाच्या भीतीने बाळावर शस्त्रक्रिया कशी करायची, हा देखील प्रश्न होता. मात्र, सोमवारी मध्यरात्री ३ वाजता सायन रुग्णालयातील ६ डॉक्टरांनी एकत्र येत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.१३ मे रोजी कावीळ, सर्दी, ताप या लक्षणांमुळे बाळाला सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्याला रक्त चढवले गेले. मात्र, बाळाची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्याची कोरोनाचाचणी केली आणि हे बाळ पॉझिटिव्ह असल्याचे निदानझाले. त्याच्यावरील उपचार सुरूझाले, मात्र बाळाची प्रकृतीआणखी बिघडली. त्यानंतरमेंदूचे सिटीस्कॅन केले गेले. सिटीस्कॅनच्या अहवालात बाळाच्या मेंदूत व आजूबाजूला रक्ताच्या गाठी दिसून आल्या.यामुळे मेंदूची संपूर्ण प्रक्रिया बिघडली होती. रक्त साखळण्याच्या प्रक्रियेतही विलंब होत होता. त्यामुळे, बाळावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, अन्यथा त्याच्या जीवाला धोका होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.बाळाची प्रकृती स्थिरबाळावर शस्त्रक्रिया करताना पीपीई किट्स घालून सर्व डॉक्टर्स सज्ज झाले होते. ४० मिलीमीटर एवढे पाणी (फ्लूड) या बाळाच्या मेंदूतून काढण्यात आले. भूलतज्ज्ञ, न्यूरोसर्जन, ओटी स्टाफ अशा ६ जणांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. आता बाळाची प्रकृती स्थिर असून त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस