Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 02:41 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates :मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतापैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत मंगळवारी ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई पालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे. यातील १५ मृत्यू हे ६ मे ते १५ मे या कालावधीतील आहेत.मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतापैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.मंगळवारचा अहवालभरती झालेले संशयित रुग्ण - ७२७, बाधित रुग्ण - १,४११, बरे झालेले रुग्ण - ६००, मृत - ४३.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई