Join us

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी, आतापर्यंत २५ हजार ३१७ बाधित रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 02:49 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईत आतापर्यंत २५ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण मृत्यू ८८२ झाले आहेत.

मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी मुंबईत ४१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, गेल्या २४ तासांत १ हजार ३८२ कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद झाली.मुंबईत आतापर्यंत २५ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण मृत्यू ८८२ झाले आहेत. गुरुवारी मृत्यू झालेल्या ४१ रुग्णांपैकी २३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या तिघांचे वय ४० वर्षांखाली होते. २१ जणांचे वय ६० वर्षांवर होते. १७ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते. गुरुवारी धारावीमध्ये नव्याने ४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ४२५ झाली आहे. भरती झालेल्या रुग्णांपैकी २८ टक्के रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यापैकी ४६ टक्के महिला व ५४ टक्के पुरुष आहेत.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस