Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Mumbai: आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात १ वर्षाची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 00:46 IST

या वर्षी वयाची ५८ वर्षे पूर्ण करणा-या अधिका-यांना पुढच्या वर्षी सेवेतून निवृत्त होता येईल.

मुंबई : पालिका रुग्णालयांमध्ये सध्या काम करणा-या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय एक वर्षाने वाढविले आहे. त्यामुळे या वर्षी वयाची ५८ वर्षे पूर्ण करणा-या अधिका-यांना पुढच्या वर्षी सेवेतून निवृत्त होता येईल.कोरोनाचा संसर्ग मुंबईत वाढत असताना पालिका कर्मचारी विशेषत: आरोग्य क्षेत्रातील अनुभवी अधिकाºयांची संख्या कमी असल्याने तात्पुरती सेवा निवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असल्याने यावषीर्ही आरोग्य विभागातील अनेक अनुभवी अधिकारी निवृत्त होत आहेत. तसेच पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय तसेच दंत महाविद्यालयातील सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, अधिष्ठाता यांची पदे प्रशासकीय कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे अनुभवी अधिकारी निवृत्त झाल्यास याचा दुपरिणाम कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला बसू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक यांच्या निवृत्तीचे वय ६३ वरून ६४ करण्यात आले. मात्र येत्या तीन महिन्यांत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकाºयांना हा नियम लागू नसेल. तसेच इच्छा नसल्यास एक वर्ष काम करण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस