CoronaVirus News: होम क्वारंटाइन रुग्णांनाे, १७ दिवस घरीच रहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 03:43 IST2021-04-04T03:42:41+5:302021-04-04T03:43:06+5:30

CoronaVirus News: पालिका प्रशासनाचे सुधारित परिपत्रक

CoronaVirus News: Home quarantine patients, stay at home for 17 days! | CoronaVirus News: होम क्वारंटाइन रुग्णांनाे, १७ दिवस घरीच रहा!

CoronaVirus News: होम क्वारंटाइन रुग्णांनाे, १७ दिवस घरीच रहा!

मुंबई : लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना एकूण १७ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पाळावा लागणार आहे. या कालावधीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येत आहे. 

याआधी होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा होता, त्यात कपात करून ताे दहा दिवसांचा असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे; त्यामुळे काही रुग्ण दहा दिवसांनंतर बिनधास्त फिरताना दिसत आहेत.  परंतु हा कालावधी १७ दिवसांचा करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले.

असा आहे नियम...
लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलगीकरणात राहून योग्य औषधोपचाराने लवकर बरे होऊ शकतात. असे रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. 
संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे गरजेचे आहे. त्यानंतर इतर रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस त्याने गृह विलगीकरण पाळणे बंधनकारक आहे. 
 

Web Title: CoronaVirus News: Home quarantine patients, stay at home for 17 days!