Join us  

CoronaVirus News : शेतकरी संघटनेने मूठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:16 PM

पूर्ण महाराष्ट्रभर मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.

मुंबईः कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण राज्यभर हजारो शेतकर्‍यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरू केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरू आहे .तसेच एफएक्यूच्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरू करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास भावांतर योजना सुरू करावी, या शेतकरी संघटनेच्या कापसासंबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी २२ मे रोजी सकाळी  ११ वाजता एकाच वेळी, पूर्ण महाराष्ट्रभर मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आसला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकर्‍यांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेडमार्फत २००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून कापूस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून करण्यात आले.

कांदा व कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना व नाराजी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मधुसूदन हरणे, मा. आमदार वामनराव चटप, मा. आमदार सरोजताई काशिकर, शे.संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गीताताई खांडेभराड, युवा अघाडी अध्यक्ष सतीश दाणी, प. म. महिला आघाडी अध्यछा सीमाताई नरोडे, उ. म. विभाग प्रमुख शशिकांत भदाने सर आदी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

हेही वाचा

CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'

VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार  

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या