Join us

CoronaVirus News: पालिकेच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना कोरोना; ८0 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 01:22 IST

पालिका रुग्णालय आणि अग्निशमन दलातील आठ कर्मचा-यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. मात्र यामुळे आतापर्यंत सुमारे २0२६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी जवळपास ८0 कर्मचारी - अधिकारी मृत्युमुखी पडले आहेत. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाºयांचा मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यापाठोपाठ पालिका रुग्णालय आणि अग्निशमन दलातील आठ कर्मचा-यांचा मृतांमध्ये समावेश आहे.मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७0 हजारांवर पोहोचली आहे. तसेच ४0६२ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी १२00 रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका गेल्या तीन महिन्यांपासून अनेक उपाययोजना करीत आहे. विशेषता झोपडपट्टी भागांमध्ये पालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे अनेक विभागांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले, पण या कार्यात पालिकेचे बहुसंख्य कर्मचारी बाधित झाले आहेत.महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी मार्च मिहन्यापासून कोरोना बाधित रु ग्णांवर उपचार करीत आहेत. यामुळे डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यापाठोपाठ प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी सफाई कामगार, अभियंता अन्य विभागातील कर्मचाºयांची मदत घेण्यात येत आहे. परिणामी आतापर्यंत हजारो कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे.तसेच सुरक्षा रक्षक, अिग्नशमन दलातील जवान, कर निर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी, कार्यकारी अभियंता व उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.>झटपट अहवाल देणाºया किटचा होणार वापर : महापालिकेने कोरोनाविरोधात लढत असलेल्या कर्मचाºयांना सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज्चा पुरवठा केला आहे. मात्र घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार बाधित क्षेत्रात सफाईचे काम करीत असताना त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आता ३0 मिनिटांत कोरोना चाचणीचा अहवाल देणाºया किटचा वापर पालिका कर्मचाºयांसाठी केला जाणार आहे.>विभाग मृत कर्मचारीघनकचरा व्यस्थापन २१पालिका रु ग्णालय १६अग्निशमन दल 0८सुरक्षा रक्षक 0७विभाग कार्यालयातील १६

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस