CoronaVirus News: दिलासादायक! चेंबूर, घाटकोपर, परळ विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:24 IST2021-06-03T09:24:22+5:302021-06-03T09:24:45+5:30
CoronaVirus News: रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४५३ दिवसांवर

CoronaVirus News: दिलासादायक! चेंबूर, घाटकोपर, परळ विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.१५ टक्क्यांवर आला आहे, तर काही महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेले परळ, चेंबूर, घाटकोपर हे विभाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.
मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढला. विशेषतः चेंबूर विभागात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सर्वच विभागांमध्ये संसर्ग वाढत गेला. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली. सक्रिय रुग्णांची संख्या 
वाढून ९२ हजारांवर पोहोचला होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने चेस दि व्हायरस, मिशन झिरो, माझी जबाबदारी अशा अनेक मोहीम सुरू केल्या.
अशा अनेक प्रयत्नांचा प्रभाव आता दिसून येत आहे. अखेर कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला आहे. दररोजच्या बाधित रुग्णांची संख्यादेखील एक हजारांच्या आसपास आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४५३ दिवसांवर पोहोचला आहे. 
विभाग        सक्रीय    रुग्ण वाढीचा 
        रुग्ण    दैनंदिन दर
एफ दक्षिण परळ    ३९१    ०.०९ टक्के
सी भुलेश्वर        ११८    ०.०९ टक्के
एन घाटकोपर    ६८०    ०.११ टक्के
एम पश्चिम चेंबूर पश्चिम    ५८९    ०.११ टक्के
एफ दक्षिण (परळ), 
सी (भुलेश्वर), एन (घाटकोपर), एम पश्चिम (चेंबूर) या विभागात नवीन बाधीत रुग्ण सापडल्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.