Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३,५२४ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:00 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के

मुंबई :  राज्यात शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर, तीन हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९ लाख ३५ हजार ६३६ झाली आहे. तर, एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण काेराेनामुक्त झाले. 

राज्यात सध्या ५२,९०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी ५९ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर २.५६ टक्के आहे. आतापर्यंत ४९ हजार ५२१ लोक कोरोनामुळे दगावले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के आहे. सध्या राज्यात दोन लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती घरगुती तर तीन हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस