CoronaVirus News : दिंडोशीच्या सोसायटीतील १४ जणांना काेराेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 07:15 AM2021-04-17T07:15:31+5:302021-04-17T07:15:54+5:30

CoronaVirus News: येथील रहिवासी, मोलकरीण, वॉचमन, गाडी धुणारे कर्मचारी आदी ३३० जणांची माेफत काेराेना चाचणी करण्यात आली.

CoronaVirus News: 14 people from Dindoshi society were killed | CoronaVirus News : दिंडोशीच्या सोसायटीतील १४ जणांना काेराेना 

CoronaVirus News : दिंडोशीच्या सोसायटीतील १४ जणांना काेराेना 

Next

मुंबई : काेराेना संसर्ग कमी करण्यासाठीच्या ‘ब्रेक द चेन’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोरेगाव पूर्व गोकुळधाम मार्केटलगत असलेल्या जेपी डेस्क या ३९० फ्लॅट्स असलेल्या गगनचुंबी गृहनिर्माण सोसायटीने नुकतेच कोरोना अँटिजेन चाचणी शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी येथील रहिवासी, मोलकरीण, वॉचमन, गाडी धुणारे कर्मचारी आदी ३३० जणांची माेफत काेराेना चाचणी करण्यात आली.  या चाचणीच्या आयाेजनासाठी येथील रहिवासी व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस जयकांत शुक्ला यांनी पुढाकार घेतला हाेता. या काेराेना चाचणीचा अहवाल आला असता साेसायटीतील एकूण १४ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समाेर आले. 
यामध्ये ३ वॉचमन, ३ मोलकरणी, ८ रहिवासी असे एकूण १४ जण पॉझिटिव्ह निघाले, अशी माहिती 
डॉ. चंद्रमोहन होळंबे यांनी दिली. 
 

Web Title: CoronaVirus News: 14 people from Dindoshi society were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.