CoronaVirus News : १२ हजार रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:53 IST2020-08-19T02:08:52+5:302020-08-19T06:53:58+5:30
आता केवळ १७ हजार ८०० सक्रिय रुग्णांपैकी १२ हजार ४१२ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळून आले आहे.

CoronaVirus News : १२ हजार रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या मुंबईत एक लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. मात्र यापैकी ८१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता केवळ १७ हजार ८०० सक्रिय रुग्णांपैकी १२ हजार ४१२ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे सध्या ५३८८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मंगळवारी दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता ८६ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. तसेच रुग्ण संख्येतील दैनंदिन वाढ सरासरी ०.८० टक्के म्हणजे सर्वात कमी आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, धारावी, कुर्ला, भायखळा या विभागात कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. तर मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेमार्फत उपाययोजना सुरू आहेत. तसेच आतापर्यंत तब्बल एक लाख चार हजार ३०१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.
त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांसाठी राखून ठेवलेल्या स्वतंत्र कोरोना हेल्थ सेंटरमध्ये ७५४८ काटा सध्या रिक्त आहेत.
यामध्ये ३३० खाटा अतिदक्षता विभागातील आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास या खाटांचा वापर सुरू करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सहा लाख ६० हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.