Join us  

CoronaVirus News :  १ लाख ११ हजार रुग्णांवर उपचार सुरू, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 4:44 AM

राज्यात बुधवारी ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर २३३ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० झाली असून १० हजार ९२८ मृत्यू झाले आहेत.

मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्क्यांवर आले आहे. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.२४ टक्के आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ८०१ असून देशात ३ लाख १९ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात बुधवारी ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर २३३ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० झाली असून १० हजार ९२८ मृत्यू झाले आहेत. राज्याचा मृत्युदर ३.९६ टक्के आहे. दिवसभरात ३ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या २३३ मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे ५, ठाणे मनपा ७, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १५, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा १, पालघर १, वसई-विरार मनपा ५, रायगड ४, पनवेल मनपा १, नाशिक ४, नाशिक मनपा ९, धुळे १, धुळे मनपा २, जळगाव ५, जळगाव मनपा ९, पुणे ६, पुणे मनपा ३१, पिंपरी-चिंचवड मनपा ११, सोलापूर ६, सोलापूर मनपा ४, सातारा १, सांगली-मीरज-कुपवाड मनपा २, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, लातूर ४, नांदेड मनपा १, अमरावती मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्य