Coronavirus: महापालिका अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविणार; ५० हजार टेस्ट किट खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:56 AM2020-08-27T03:56:24+5:302020-08-27T03:56:37+5:30

रुग्णांचे वेळेत निदान होणे अत्यंत आवश्यक असते. त्यातही कोरोनासारख्या जीवघेण्या आजारात ही बाब आणखी महत्त्वाची ठरते.

Coronavirus: Municipal to increase number of antigen tests; Purchase of 50,000 test kits | Coronavirus: महापालिका अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविणार; ५० हजार टेस्ट किट खरेदी

Coronavirus: महापालिका अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविणार; ५० हजार टेस्ट किट खरेदी

Next

मुंबई : कोरोनाचे निदान लवकर व्हावे आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केवळ ३० मिनिटांत कोरोनाचे निदान करण्याऱ्या अँटिजेन चाचणीचा पर्याय मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला.

या अँटिजेन चाचणीचा मोठा फायदा होत असल्याने आता पालिकेने अँटिजेन टेस्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिका आता आणखी ५० हजार अँटिजेन टेस्ट किट खरेदी करणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून लवकरच हे किट्स मुंबईत येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत पालिकेच्या माध्यमातून ७० हजार अँटिजेन चाचण्या झाल्या असून याचा मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रुग्णांचे वेळेत निदान होणे अत्यंत आवश्यक असते. त्यातही कोरोनासारख्या जीवघेण्या आजारात ही बाब आणखी महत्त्वाची ठरते. पण कोरोनाच्या चाचणीसाठी जी आरटी-पीसीआर पद्धत वापरली जाते, त्याचा अहवाल येण्यास २४ तास वा त्यापेक्षा अधिक काळ लागतो. दरम्यानच्या काळात निदान न झाल्याने कोणतेही उपचार चाचणी केलेल्या व्यक्तीला मिळत नाहीत. परिणामी त्याचा संसर्ग वाढून ती व्यक्ती गंभीर होते. हेच चित्र मार्च-एप्रिल-मेमध्ये मुंबईत होते.

१ लाख किटचा वापर
या किट्सचा वापर मुंबईत केला जात असून आतापर्यंत एक लाखापैकी ७० हजार किटचा वापर झाला आहे. यातून मोठ्या संख्येने रूग्ण शोधण्यास आणि त्यांना वेळेत उपचार सुरू करण्यास मदत झाल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे. तर आता पालिकेकडे केवळ ३० हजार किट्स उरले असून ते संपण्याआधी नवीन किट्स खरेदी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ५० हजार किट्स खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हे किट्स उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Coronavirus: Municipal to increase number of antigen tests; Purchase of 50,000 test kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.