Join us  

Coronavirus : महापालिकांच्या निवडणुका, कॉलेज परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागांतील शाळाही बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 7:01 AM

दोन महिन्यांत होणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील. औरंगाबाद व नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये होणार होती.

मुंबई : कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुका आणि ३१ मार्चला होणाऱ्या दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसा आदेश आयोगाकडून मंगळवारी काढला जाईल.दोन महिन्यांत होणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील. औरंगाबाद व नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये होणार होती. आता ती पुढे ढकलली जाईल. वसई-विरारची निवडणूक जून-जुलैमध्ये होती.राज्यात १५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. ३१ मार्चला होणारी ही निवडणूकही पुढे जाईल. जळगावच्या भडगाव व वरणगाव नगरपालिका (एप्रिल), ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर, पुण्याच्या राजगुरू नगर, नांदेड जिल्ह्यातील भोकर, नागपूर जिल्ह्यातील वाडी व मोवाड नगरपालिका/ नगरपंचायती यांच्या निवडणुकाही (मे) पुढे ढकलल्या जातील.राज्याच्या सर्व सरकारी कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरीला तात्पुरती स्थागिती देण्यात आली आहे.महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेशमंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडे येणाºया महत्त्वाच्या केवळ दहा व्यक्तींना व मुख्य सचिव, सचिवांकडे येणाºया पाच व्यक्तींना रोज प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून प्रवेश देण्यात येईल. क्षेत्रीय कार्यालयांमधून दैनंदिन कामकाजासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी यांनासुद्धा मंत्रालयात प्रवेश नसेल.परीक्षा लांबणीवरसर्व महाविद्यालये, विद्यापीठे ३१ मार्चपर्यंत बंद राहतील ३१ मार्चच्या आधीच्या परीक्षा रद्द केल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. खासगी क्लासेस बंद राहतील. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची संमती असून, जे विद्यार्थी परदेशात आहेत, त्यांच्या परतीस असलेले निर्बंध कायम आहेत.घाबरू नका, स्वयंशिस्त पाळापुढचे १५ ते २० दिवस अत्यंत काळजीचे आहेत. जगभरात दुुसºया व तिसºया आठवड्यात हे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कायदा करण्यापेक्षा स्वत:च स्वत:ला शिस्त लावा आणि या बिकट परिस्थितीवर मात करण्यास मदत करा. आम्ही अजूनही सगळे व्यवहार बंद अशी भूमिका घेतलेली नाही, मात्र जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. करोना बाधित रुग्णांना वाईट वागणूक देऊ नका. त्यांची तब्येत नीट होण्यासाठी त्यांना सहकार्य करा.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीराज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णयग्रामीण भागातील शाळा बंद ठेवणारज्यांना १०० टक्के घरीच क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा. तसेच मतदानाच्या वेळी जसे बोटाला शाई लावली जाते तशीही लावण्यात यावी.नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमहाराष्ट्र सरकार