Coronavirus Mumbai Updates: मुंबईत दहा लाख लोकांचे लसीकरण; ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:43 AM2021-03-27T02:43:41+5:302021-03-27T02:44:03+5:30

महापालिकेच्या केंद्रांमध्ये ७० टक्के लसीकरण

Coronavirus Mumbai Updates: Vaccination of one million people in Mumbai; Senior citizens at the forefront | Coronavirus Mumbai Updates: मुंबईत दहा लाख लोकांचे लसीकरण; ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

Coronavirus Mumbai Updates: मुंबईत दहा लाख लोकांचे लसीकरण; ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

Next

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महापालिकेने आतापर्यंत दहा लाख लोकांना लस दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या लोकांना लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे लस घेण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असून, त्यांचे प्रमाण ४७.३६ टक्के एवढे आहे.

मुंबईत १ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, तर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे व सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. एकूण दहा लाख आठ हजार ३२३ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी सात लाख सात हजार ४७४( ७०.१६ टक्के) लसीकरण पालिकेच्या केंद्रांवर करण्यात आले. 

आरोग्य सेवक-एकूण दोन लाख ३१ हजार ८९९ 

दोन्ही डोस घेणारे (३४.५६ टक्के), तर पहिला डोस घेणारे - एक लाख ५१ हजार ७४४ (६५.४४ टक्के) इतके आहेत.

कोविशिल्डचे नऊ लाख ३२ हजार २९१ डोस तर कोव्हॅक्सिन लसीचे ७६ हजार २७ डोस देण्यात आले आहेत.

पहिला डोस - एक लाख ६३ हजार ५२५ (७४.२३ टक्के) 
ज्येष्ठ नागरिक - चार लाख ७७ हजार ५०७  
४५ वर्षांहून अधिक वय व सहव्याधी - ७८ हजार ६२२ 
फ्रंटलाइन वर्कर्स - आतापर्यंत दोन लाख २० हजार २९५  
दोन्ही डोस - ५६ हजार ७७० (२५.७७ टक्के)

१०६ लसीकरण केंद्रे
सध्या मुंबईत १०६ लसीकरण केंद्रे असून यापैकी २८ महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत. या केंद्रांवर एकूण १५५ लसीकरण बूथ आहेत, तर राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील १२ केंद्रांवर १८ लसीकरण बूथ आहेत. विविध खासगी रुग्णालयांमध्ये ६६ केंद्रे असून, ७४ बूथ आहेत. 

Web Title: Coronavirus Mumbai Updates: Vaccination of one million people in Mumbai; Senior citizens at the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.