Join us

Coronavirus : मुंबईत नवे १६ रुग्ण वाढले; १० जणांना संपर्कातून कोरोनाची लागण, ४१८ जणांचे अलगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 05:54 IST

coronavirus : सोमवारी कस्तुरबा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि खासगी रुग्णालयांच्या एकत्रित अहवालानुसार, मुंबईत १६ कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर, रविवारी ४१८ आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्यांचे अलगीकरण करण्यात आले.

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढतोय, परिणामी प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या निर्देशांचे मात्र काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. सोमवारी शहर उपनगरांत १६ कोरोना रुग्णांचे निदान झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.यातील १६ मधील १० जणांना निकट संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे निदान आहे. मुंबईकरांनी सतर्कता बाळगून घरातच राहण्याचे आवाहन यंत्रणांकडून होते आहे. सोमवारी कस्तुरबा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि खासगी रुग्णालयांच्या एकत्रित अहवालानुसार, मुंबईत १६ कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर, रविवारी ४१८ आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्यांचे अलगीकरण करण्यात आले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई