Join us

Coronavirus : मुंबई पालिका करणार घरोघरी जाऊन कोविड-१९ची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:03 IST

coronavirus : सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे.

मुंबई : संशयित रुग्णांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे नवीन दूरध्वनी क्र मांक सुरू होत आहेत. ही सुविधा पुढील दोन दिवसांपासून सुरू होईल.सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे. हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर हेल्पलाइनवर डॉक्टर संशयित रु ग्णांची पूर्ण माहिती घेतील. गरज भासल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील. चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठविणे, यासाठी समन्वय करून देतील.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई