Join us

Coronavirus : मुंबईत होळी, धुलिवंदन साजरा करण्यास महापालिकेची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 21:21 IST

होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यास मुंबई महानगरपालिकेनं मनाई केली आहे.

ठळक मुद्देपालन न करणाऱ्यांवर कारवाईचा पालिकेचा इशारागेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आणि मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेनं काही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं यावेळी होळी आणि धुलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेनं यासंबंधी एक पत्रक जारी केलं आहे.कोरोनाच्या पुन्हा वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हमून गर्दी टाळण्यासाठी २८ मार्च रोजी साजरा केला जाणारा होलिकोत्सव, तसंच २९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार धुलिवंदन/रंगपंचमी हा उत्सव खासगी अथवा सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई असेल. तसंच वैयक्तिकरित्याही मी जबाबदार या मोहिमेअंतर्गत टाळावं, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.  दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पालिकेनं दिला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या ताज्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ३ हजार ५१२ नवे करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर दिवसभरात एकूण १२०३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहोळीमुंबईकोरोना वायरस बातम्या