CoronaVirus: मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या वेषात; डॉक्टर अन् नर्सेसचा वाढवला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:37 PM2020-04-27T15:37:28+5:302020-04-27T15:41:57+5:30

मुंबईच्या महापौर परिचारिकेचा गणवेश घालून नायर रुग्णालयात

CoronaVirus mumbai mayor kishori pednekar reach nair hospital in nurse uniform to boost confidence of medical staff kkg | CoronaVirus: मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या वेषात; डॉक्टर अन् नर्सेसचा वाढवला आत्मविश्वास

CoronaVirus: मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या वेषात; डॉक्टर अन् नर्सेसचा वाढवला आत्मविश्वास

Next

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातल्या २८ हजार रुग्णांपैकी एकटे ५ हजार रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईतल्या आरोग्य सेवेवर मोठा ताण आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊ महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्या परिचारिकेच्या गणवेशातच रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधी परिचारिका म्हणून केलं आहे. अनेक वर्षे शिवसेनेच्या नगरसेविका राहिलेल्या पेडणेकर सध्या महापौर म्हणून काम करत आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा खूप मोठा ताण आहे. त्यामुळे त्यांचा हुरुप वाढवण्यासाठी पेडणेकर परिचारिका घालत असलेला गणवेश परिधान करुन नायर रुग्णालयात आल्या. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या.

सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे २८ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. यातले ३० टक्क्यांहून अधिक म्हणजेच जवळपास हजार रुग्ण एकट्या भारतात आहे. देशातल्या सर्व राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राजधानी मुंबईत कोरोनाचे जवळपास साडे पाच हजार रुग्ण आहेत. लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असल्यानं मुंबईत संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त आहे.

३ मे नंतरही लॉकडाऊन वाढणार?, पंतप्रधानांसोबतच्या VC मध्ये अनेक मुख्यमंत्र्यांची सूचना

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

Web Title: CoronaVirus mumbai mayor kishori pednekar reach nair hospital in nurse uniform to boost confidence of medical staff kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.