CoronaVirus Lockdown News: local in Mumbai will continue even in lockdown | CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध आणि शनिवार, रविवारसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लावले असले तरी, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मुंबई उपनगरी लोकलसाठी नवीन नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना मर्यादित वेळेत रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सोमवारी राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली. या नवीन नियमावलीत लोकल आणि रेल्वे प्रवासावर काही निर्बंध येतील अशी शंका सर्वसामान्यांना होती. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेची मर्यादा घालून १ फेब्रुवारीपासून लोकल सुरू केली होती. तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

सध्या मुंबई उपनगरीय लोकल फेऱ्या मध्य रेल्वेवर १६८५ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १३०० धावत आहे. तसेच रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी येथे बसू नका असे पत्रकसुद्धा आसनावर लावण्यात आले होते. मात्र, प्रवासी या नियमांची अंमलबजावणी करत नाहीत. 

रिक्षा, टॅक्सीनेही करता येणार प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने दोन तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे, तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे.

सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यावेळी शासनाने घालून दिलेले नियम होते. तेच नियम आता लागू राहणार आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये फक्त आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवेश दिला जाईल. तसेच प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे नव्या नियमावलीत कोणत्याही प्रकारचा नवीन नियम आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही.
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Lockdown News: local in Mumbai will continue even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.