Join us  

Lockdown: राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 7:13 PM

Lockdown in Maharashtra: लॉकडाऊननंतर घटत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली.

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. (Coronavirus in Maharashtra) लॉकडाऊननंतर घटत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. (Lockdown in Maharashtra) तसेच हा लॉकडाऊन काही दिवस यावा, अशी मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. मात्र आता त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  (Lockdown in Maharashtra to increase till May 31, Rajesh Tope's clear signal after cabinet meeting)

लॉकडाऊनबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे.  भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा, असा कल मंत्रिमंडळाने दर्शवला. तसेच मुख्यमंत्र्याना सांगण्यात आले. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्यात लागू असलेले कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात ६८ हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून ४० हजारांपर्यंत आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र सरकारराजेश टोपे