Join us

CoronaVirus Lockdown : महामुंबईत शुकशुकाट, लाॅकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:12 IST

CoronaVirus Lockdown : शनिवार सकाळपासून रात्रीपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. 

मुंबई :  कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी सरकारने शनिवारसह रविवारी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशीच्या लाॅकडाऊनला मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शनिवार सकाळपासून रात्रीपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी रात्री आठनंतर मुंबईचे रस्ते ओसाड हाेऊ लागले आणि शनिवारची पहाट उजाडल्यानंतर यात भरच पडली. काही सोसायटी अथवा रहिवासी क्षेत्रात काही दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र हे प्रमाण तुलनेने फारच कमी होते. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई