CoronaVirus News: पहिल्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 04:28 AM2020-06-16T04:28:49+5:302020-06-16T06:38:51+5:30

फिजिकल डिस्टन्स ठेवून कर्मचाऱ्यांनी केला प्रवास

CoronaVirus Less crowd in local on the first day | CoronaVirus News: पहिल्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अनभिज्ञ

CoronaVirus News: पहिल्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अनभिज्ञ

Next

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय रविवारी रात्री उशिरा घेतला. त्यामुळे सोमवारी लोकल सुरू झाल्याबाबत कर्मचारी अनभिज्ञ होते. परिणामी, पहिल्या दिवशी लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. प्रत्येक डब्यात फिजिकल डिस्टन्स ठेवून कर्मचाºयांनी प्रवास केला.

राज्य सरकारकडून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे लोकल सेवा सुरू होणार आहे, याची माहिती कर्मचाºयांना होती. मात्र ती कधी होणार, वेळापत्रक कसे असेल याबाबत कर्मचारी अनभिज्ञ होते. यातच मध्य आणि पश्चिम रेल्वे यांच्याकडून अधिकृत माहिती रविवारी रात्री उशिरा दिली. परिणामी, सोमवारी लोकलमध्ये तुरळक प्रवाशांनी प्रवास केला.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना लोकल सुरू झाल्याची माहिती उशिरा मिळाली. सकाळच्या सत्रात प्रवाशांनी प्रवास केला नाही. त्यामुळे लोकल मध्ये खूप कमी गर्दी होती. मात्र दुपारच्या सत्रात प्रवासी संख्या वाढली. दरम्यान, मंगळवारी लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया म्युनिसिपल मजदुर युनियन मुंबईचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.

आम्हाला सापत्न वागणूक का? : शासकीय कर्मचाºयांइतकीच खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांची सेवा महत्त्वाची असून देशाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरण्यात आमचाही मोठा वाटा आहे. असे असताना आम्हाला सापत्न वागणूक का, असा सवाल खासगी क्षेत्रातील काही प्रवाशांनी केला.
आम्हालाही रेल्वेची सुविधा मिळावी, अशी मागणी केली. कल्याण, अंबरनाथ, बदलापूरमध्येही बस स्थानकामध्ये प्रवाशांची रांग लागलेली होती. तेथेही बस प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

नेमका प्रवास कोणी केला...
सोमवारी कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पालघर, मीरा भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कर्मचाºयांसह पोलीस, बेस्ट कर्मचारी, मंत्रालय कर्मचारी आणि सरकारी, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाºयांनी प्रवास केला. मात्र बँकेतील कर्मचारी, खासगी कंपनीतील कर्मचाºयांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली.
च्पहाटेपासून स्थानकावर रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे कर्मचारी तपासणीसाठी उभे होते. थर्मल स्क्रिनिंग आणि अत्यावश्यक सेवेत काम कर्मचाºयांचे अधिकृत ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणालाही स्थानकात प्रवेश मिळत नव्हता. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये प्रवाशांनी उभे राहण्यासाठी स्थानकावर वर्तुळे तयार केली आहेत.

कुर्ल्यात कमी गर्दी
हार्बर व मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे व गर्दीचे स्थानक असणाºया कुर्ला येथे अत्यंत कमी प्रवासी होते. कुर्ला स्थानकावरील पूर्व पश्चिम परिसरांना जोडणाºया प्रमुख पुलावरील मुख्य प्रवेशद्वार बंद होता. त्याऐवजी पर्यायी जिन्यावरून स्थानकात प्रवेश देण्यात येत होता.

अतिरिक्त आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्स
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी ई-पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासन करीत आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी मुंबई प्रदेशातील सर्व महापालिकांशी संपर्क साधून कर्मचाºयांच्या लोकल प्रवासाबाबत आवश्यक उपायोजना आणि कार्यपद्धती निश्चित केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत प्रवासामध्ये सुलभता आणण्याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वे प्रवासासाठी तूर्तास ओळखपत्रच ग्राह्य धरले जात आहे. मात्र क्यूआर कोडवर आधारित ई-पाससाठी संबंधित यंत्रणांनी पोलिसांशी समन्वय साधून आपापल्या स्तरावर कार्यवाही करावी अशा सूचना करण्यात आली.

डोळ्यादेखत लोकल वेगाने मार्गस्थ
या लोकल केवळ जलद मार्गावर चालवण्यात येत असल्याने धीम्या मार्गावरील स्थानकात ही लोकल थांबत नसल्याने त्या भागात राहणाºया कर्मचाºयांना मात्र त्याचा लाभ होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंब्रा स्थानकात आलेल्या कर्मचाºयांनी त्यांच्या डोळ्यासमोर आलेली लोकल स्थानकात न थांबता गेल्याने नाराजी व्यक्त केली. कर्जतहून येणारी लोकल बदलापूर, अंबरनाथ नंतर सरळ कल्याण येथे थांबली. त्यामुळे उल्हासनगर स्थानकातून बस पकडून कल्याण गाठले. त्यानंतर लोकल प्रवास केला असल्याची माहिती एका पोलीस कर्मचाºयाने दिली.

तर, सायन रुग्णालयात जाण्यासाठी जी.टी.बी. नगर जवळ आहे. मात्र येथे लोकल न थांबली नाही. त्यामुळे वडाळ्याला जाऊन पुन्हा बसने परतीचा प्रवास केल्याची माहिती एका वैद्यकीय कर्मचाºयांनी दिली.
तर मुंबईतील परळ, चिंचपोकळी, करी रोड येथे रुग्णालयाची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे लोकल थांबा द्यावा. तर बँकेतील कर्मचाºयांनाही प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली

Web Title: CoronaVirus Less crowd in local on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.