Join us  

coronavirus: यंदा शाळा सुरू होण्याचा १५ जूनचा मुहूर्त टळणार, नवीन शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:48 AM

लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे.

मुंबई : शालेय शिक्षण विभागाचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश नसले तरी नवीन शैक्षणिक वर्ष हे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जुलैनंतरच सुरू करावे, अशी मागणी शिक्षक, पालकांमधून होत आहे. शिक्षण विभागाचा दरवर्षीप्रमाणे १५ जून रोजी शाळा सुरू करण्याचा मानस असला तरी परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. तरी परिस्थिती पाहता शाळा लॉकडाउन उठवल्यानंतर लगेच सुरू करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षात शाळा जुलैनंतर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.लर्निंग फ्रॉम होमच्या माध्यमातून सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. मात्र लॉकडाउन उठल्यानंतर शाळा आणि त्यांचे नियोजन कसे असणार याबाबत शाळा सुरू करण्याआधी शालेय शिक्षण विभागाने धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केले आहे.लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा व नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर शासकीय पातळीवर हालचाली होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.निर्जंतुकीकरणाची आवश्यकताअनेक सरकारी, पालिका शाळा या कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. शिवाय खासगी शाळांमध्येही निर्जंतुकीकरणाची गरज आहेच. लॉकडाउन उठण्याऐवजी या विषाणूंवर औषध मिळेपर्यंत शाळा पूर्णपणे सुरू करू नयेत, असे मत इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनच्या अनुभा सहाय यांनी व्यक्त केले. लॉकडाउन उठल्यावर लगेचच शाळा सुरु केल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईशाळा