Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 23:16 IST

बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई – महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात तसेच इतर सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेसाठी परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माते, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, क्ष किरण सहाय्यक, प्राध्यापक अशा विविध संवर्गाची पदे कार्यरत आहेत. या पदांपैकी बरीच पदे रिक्त असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे.  परंतु, ही अत्यावश्यक सेवा असल्याने रिक्त पदे भरण्यास बराच कालावधी लागत असल्याने सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीने कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. या काळात बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कंत्राटी तत्वावरील कार्यरत असलेल्या उमेदवारांची सध्या सर्व रुग्णालयांना गरज आहे. त्यामुळे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक यांच्या अखत्यारित हा निर्णय घेण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका