Join us  

Coronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 2:29 PM

तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत.

ठळक मुद्देदेश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवीजे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे.

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात. अनेक जण या कार्यात मदत करतायेत. काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलतायेत त्या सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापतो. पण कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मंगळवारपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे . देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. पंतप्रधानांशी चर्चा होत असते. सोनिया गांधी, शरद पवारांशी चर्चा झाली, अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.

तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे. आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा. सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे. दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली. जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

त्याचसोबत राज्यात ५ लाखाच्या आसपास परराज्यातील मजूर वास्तव्यात आहे. त्यांना दोन वेळचं जेवण, डॉक्टर्स वैगेरे सुविधा दिल्या आहेत. कोणालाही कुठे जायची गरज नाही. आमच्या राज्यातील लोकांचीही इतर राज्यात काळजी घ्यावी. इतर राज्यात कोणीही माणूस अडकला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांची मदत करण्याबाबत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

दरम्यान, अतिरेक्यांचे लक्ष मुंबईत असते तर व्हायरसचं लक्षही मुंबई आहे. मुंबईकर शौर्याने या संकटाला सामोरे जात आहे. मुंबईने अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे मुंबईला काही होणार नाही. लोकांनी काळजी घ्या. कोविड १९ ची लक्षण आढळत असतील तर जे हॉस्पिटल दिलेत तिथेच चाचणी करण्यास जा. सर्दी, खोकला या सर्वापासून खबरदारी घ्या.  अत्यावश्यक कामासाठी जर बाहेर जात असाल तर मास्क लावलं पाहिजे असं सिंगापूरमध्ये सांगितलं तसं आपल्याकडेही करायला हरकत नाही. मास्क पाहिजे असं नाही घरातील स्वच्छ कापड तोंडाला बांधून बाहेर जा. मार्केटमध्ये गर्दी करु नका, २४ तास दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. गर्दीतसुद्धा अंतर ठेऊन राहा अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे