Join us  

coronavirus: उपाशीपोटी कोरोनाशी आम्ही कसे लढायचे  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:55 AM

मजास डेपोमधील एका कर्मचाºयाचा नुकताच मृत्यू झाला होता. दोन कॅन्टीन कामगार संशयित असल्यामुळे कालपासून कॅन्टीन बंद करण्यात आली आहे.

मुंबई : बेस्टच्या मजास डेपोतील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दोन कर्मचारी संशयित आढळले होते. त्यामुळे कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. उपाशीपोटी कोरोनाशी कसे लढायचे, असा सवाल कर्मचाºयांनी विचारला आहे.याबाबत बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण गुप्ता म्हणाले की, मजास डेपोमधील एका कर्मचाºयाचा नुकताच मृत्यू झाला होता. दोन कॅन्टीन कामगार संशयित असल्यामुळे कालपासून कॅन्टीन बंद करण्यात आली आहे. कॅन्टीनच्या कामगारांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे उपचारांसाठी पाठवले़ तेथून त्यांना गोळी देऊन पुन्हा परत पाठवण्यात आलेले आहे़ पण कर्मचाºयांच्या जेवणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.तर एका चालकाने सांगितले की, अनेक चालक बदलापूर, कल्याण-डोंबिवली असे लांबून येतात. सकाळी लवकर निघावे लागते. कधी कधी त्यांना डबा आणणे शक्य होत नाही. ते कॅन्टीनमध्ये जेवण करायचे. कोरोनाची साथ आहे त्यामुळे उपाशी राहून काम करू नये, असे सांगितले जाते. पण आमच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही, असे ते म्हणाले. इतर काही बस आगारांमध्येही कॅटींन बंद असल्याने कामगारांची गैरसोय होत आहे़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसबेस्टमुंबई