Join us  

coronavirus: राज्यात बंद असलेली हॉटेल, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:57 AM

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी हॉटेल व्यवसायिकांच्या संघटना ‘आहार’च्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

मुंबई : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायाबाबत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती निश्चित झाल्यानंतर हॉटेल सुरू करता येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी हॉटेल व्यवसायिकांच्या संघटना ‘आहार’च्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी ‘मिशन बिगिन अगेन’नुसार सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना सुरू झाल्या आहेत. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने हॉटेल व्यवसायिक व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मुंबई, पुणे अशा महानगरांत हॉटेल सुरू नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. परप्रांतीय कामगार आणि मजूर वर्गही आता परत येत आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगाला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.अशी घ्यावीलागेल काळजीहॉटेलमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालनटेबलची रचनाबदलावी लागणारकर्मचारी व ग्राहकांनामास्क अनिवार्यनिर्जंतुकीकरण आवश्यकगर्दी टाळावी लागणारमुंबई, पुण्यातसुविधांवर भरमुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत सरकारने जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. कोरोनानंतर हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. हे करताना या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हा उद्योगपरत कसा सुरु करता येईल यासाठी चाचपणी सुरू आहे. हॉटेल तसेच लॉज सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. येणारा प्रत्येकजण निरोगी असेल यासाठी तपासणी करावी लागेल. एक पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आलातरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. त्यासाठीच आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नियमांचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.राज्यातील हॉटेल उद्योगाला आता खेळते भांडवल मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायात इतर राज्यांशी आपली मोठी स्पर्धा कायम असते. आता काही प्रमाणात हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी, त्यामुळे पर्यटक जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहतील. सध्या हॉटेलांना औद्योगिक दरात वीज आणि पाणी द्यावे.- गुरुबक्ष सिंग कोहली, इंडियन हॉटेल्स असोसिएशन

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे