Join us

coronavirus: टॅक्सी चालकांना सहा महिने मदत करा, जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 03:08 IST

जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य बबनराव वनवे म्हणाले की, लॉकडाउन काळात वाहतूक व्यवसायाचे नुकसान झाले आहे. कित्येक ट्रक उभे आहेत, रिक्षा, टॅक्सी उभ्या आहेत. त्यावरच चालक-मालकांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. टॅक्सी बंद असून त्यामुळे टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सरकारने टॅक्सी चालकांना सहा महिने ५००० रुपये मदत करावी, अशी मागणी जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य बबनराव वनवे म्हणाले की, लॉकडाउन काळात वाहतूक व्यवसायाचे नुकसान झाले आहे. कित्येक ट्रक उभे आहेत, रिक्षा, टॅक्सी उभ्या आहेत. त्यावरच चालक-मालकांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो. पण आता ते बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सहा महिने ट्रकचा टॅक्स माफ करण्यात यावा. सहा महिने कर्जाचे हप्ते घेऊ नयेत, त्यावरील व्याज शासनाने माफ करावे. टॅक्सी व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रति महिना ५००० रुपये सहा महिने मदत करावी. रिक्षा व्यवसायही पूर्ण बंद असल्याने त्यांना प्रति महिना किमान सहा महिने ३००० रुपये मदत मिळावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसटॅक्सीमुंबई