Join us

Coronavirus: जनता कर्फ्यूनंतर अतिउत्साहींचा थाळीनाद सर्कशीच्या खेळासारखा; कलावंतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:03 IST

coronavirus : त्यापैकी काहींनी फटाके फोडले. हा सर्व प्रकार म्हणजे सर्कशीतल्या खेळांसारखा आहे अशी टीका अभिनेत्री रिचा चढ्ढाने केली. असाच टीकेचा सूर अभिनेत्री सोनम कपूर, निमरत कौर यांसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी लावला आहे.

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अव्याहतपणे काम करणाऱ्या वैद्यकीय व अन्य क्षेत्रांतील लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी अतिउत्साही लोकांनी रस्त्यांवर जमा होऊन थाळी, शंखनाद केला.त्यापैकी काहींनी फटाके फोडले. हा सर्व प्रकार म्हणजे सर्कशीतल्या खेळांसारखा आहे अशी टीका अभिनेत्री रिचा चढ्ढाने केली. असाच टीकेचा सूर अभिनेत्री सोनम कपूर, निमरत कौर यांसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी लावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कोरोनाशी मुकाबला करणाºया लोकांबद्दल कृतज्ञता दर्शविण्यासाठी अवघी पाच मिनिटे लोकांनी थाळी, शंखनाद करणे किंवा टाळ्या वाजविणे अपेक्षित होते. त्याऐवजी अतिउत्साही लोकांनी वीस ते पंचवीस मिनिटे हा प्रकार केला. कोरोनाची साथ फैलावू नये म्हणून गर्दी टाळणे गरजेचे असूनही त्याकडे थाळीनादाच्या वेळी लोकांनी दुर्लक्ष केले.काही ठिकाणी कोरोना गरबा खेळण्याचा प्रकारही घडला. या गोष्टींवर लंचबॉक्स चित्रपटातील कलावंत निमरत कौरने एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गाविरोधात जनता कर्फ्यू पाळल्यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरून जे खेळ केले त्यामुळे या देशाविषयी अधिकच चिंता वाटू लागली आहे.जनता कर्फ्यूनिमित्त काही मुलांनी केलेल्या नाचाचा व्हिडीओ झळकवून रिचा चढ्ढाने म्हटले आहे की, हा सारा मूर्खपणा आहे. जनता कर्फ्यू पाळताना नाचगाणी करणे अपेक्षित नव्हते.साथीचा उत्सव करू नकाकोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केलेल्या उपाययोजना अनेक लोक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली होती. या उपाययोजना अधिक प्रभावीपणे अमलात आणाव्यात, असे मोदी यांनी राज्यांना आवाहन केले. पंतप्रधानांच्या टिष्ट्वटला प्रतिसाद देताना चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सांगितले की, बेजबाबदारीने वागणाºया लोकांना पंतप्रधानांनी खडसावणे आवश्यक होते. करण जोहर म्हणाले की, कोरोनापासून वाचण्यासाठी योग्य उपायांचा अवलंब करा. अभिनेत्री क्रितिका कामराने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्याकरिता प्रत्येकाने घरी थांबणे हा उत्तम उपाय आहे. या साथीचा उत्सव करता कामा नये.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई