Join us  

जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल; उद्धव ठाकरेंचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 9:01 PM

CoronaVirus : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

ठळक मुद्देलॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मुंबई : आज सकाळी औरंगाबाद-जालनाजवळ मजुरांची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे, असे म्हणत मजुरांनी संयम बाळगावा, आम्ही राज्यांशी संपर्क करुन ट्रेन सुरु करत आहोत. जिथे आहात तिथेच थांबा, सरकार तुम्हाला घरी पाठवेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरीत मजुरांना केले आहे. 

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी अफवांना बळी पडू नका, ट्रेन सुरु होत आहेत म्हणून कुठेही जाऊ नका, ज्या मजुरांचा अपघात झाला ते भुसावळकडे जात होते. रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात होते आणि त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?- इतर राज्यांतील मजुरांची जेवणा-खाण्याची सोय केली आहे.- केंद्राशी समन्वय साधून मजुरांचे स्थलांतर करण्यात येईल.- इतर राज्यांसोबत बोलणी सुरू आहेत. केंद्र राज्य आणि ते राज्य ट्रेनची सोय केली आहे. काही ट्रेन सुरू झाल्या आहेत.-मुंबईत लष्कर आणले जाणार ही अफवा, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये.- संयमाच्या जिद्दीच्या जोरावर कोरोनाशी लढताय; गैरसमज, गडबड गोंधळ होता कामा नये. -कोठेही गर्दी होता कामा नये, धोका टळलेला नाही, मजुरांनी संयम कायम ठेवावा, महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे. - जिथे आहात तिथेच थांबा, जशी सोय होईल तसे घरी पाठवतो. शांती ठेवा, अस्वस्थ होऊ नका, असे मजुरांना आवाहन- संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे.- सर्व उपाययोजना करत आहोत, बीकेसीमध्ये कोविड रुग्णालय उभे राहात आहे, ते दुपटीने वाढवू, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करु.- रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, सर्व व्यवस्थित असताना गलथानपणा चालणार नाही.- राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस