Join us  

coronavirus: "कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कोविड योद्ध्यांना शहिदांचा दर्जा आणि वारसांना शासकीय नोकरी द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 3:56 PM

आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैदयकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत शासनाने करणे आहे

मुंबई - कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली."आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैदयकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत शासनाने करणे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. या कोविड योध्दांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही दरेकर यांनी केली. पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्यापत्रकार पुण्यात पांडुरंग रायकर यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविधान भवनप्रवीण दरेकर