Join us

coronavirus: पार्किंगच्या ड्रमवर सापडले चाळीस पीपीई किट, ओशिवरा कब्रस्तानजवळचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:49 IST

सध्या केमिस्ट, खासगी लॅबचे कर्मचारी, रुग्णालयात रुग्णांसोबतचे नातेवाईकही किट परिधान करतात. त्यामुळे हे किट फेकणारे कोण आहेत, याबाबत परिसरात चर्चा आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकर  मुंबई : मालाडमध्ये कचरापेटीत पीपीई किट सापडल्यानंतर आता जोगेश्वरीतील पार्किंगच्या ड्रमवर पीपीई किटचा ढीग सापडला आहे.ओशिवरा कब्रस्तानच्या रिलीफ रोडवर पार्किंगसाठी माती भरलेले निळे ड्रम आहेत. त्यावर दीड महिन्यापासून पीपीई किट फेकले जात आहेत. रात्रीच्या वेळी कोणी नसताना ते टाकले जातात. हे कोण करतेय, याची माहिती अद्याप पालिकेला नाही.सध्या केमिस्ट, खासगी लॅबचे कर्मचारी, रुग्णालयात रुग्णांसोबतचे नातेवाईकही किट परिधान करतात. त्यामुळे हे किट फेकणारे कोण आहेत, याबाबत परिसरात चर्चा आहे. हे किट अनेकदा श्वानांकडून इतरत्र पसरविले जातात. परिणामी परिसरात कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे.के-पश्चिम घनकचरा विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून हा कचरा उचलत आहेत. दीड महिन्यात त्यांनी ३० ते ४० किट गोळा केले. यात हॅण्ड ग्लोव्हज्, मास्कही होते.हेल्पलाइनवर संपर्क साधापालिकेने हा कचरा गोळा करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धत अवलंबिली आहे. त्यामुळे नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक १९१६ वर संपर्क साधून याची माहिती आम्हाला द्यावी. आमच्या विशेष पाच गाड्या हा कचरा उचलण्यासाठी आहेत. मात्र, नागरिकांनी कुठेही पीपीई किट फेकून पालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिकांचा जीवही धोक्यात घालू नये.- माधव गायकवाड, कनिष्ठ आवेक्षक,घनकचरा विभाग (के-पश्चिम) 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई