Join us  

Coronavirus : ‘कोरोना’ से मत ‘डरो’ ना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 3:08 AM

घाबरून न जाता 'कोरोना' शी मुकाबला कसा करायला हवा, यावर तरुणांनी व्यक्त केलेली मते.

कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सध्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. साथ पसरू नये म्हणून विलगीकरणांसह तपासण्यांवर भर दिला जात आहे. घाबरून न जाता 'कोरोना' शी मुकाबला कसा करायला हवा, यावर तरुणांनी व्यक्त केलेली मते.कोरोना विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, डिसेंबरनंतर अनेक प्रकरणे पुढे आली. या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणूचा फैलाव तब्बल १००हून अधिक देशांत झाल्याचे समोर आले आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहोत. प्रशासन आणि सरकारच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहात आहोत. या आजाराची सर्वांत मोठी समस्या अशी आहे की, आतापर्यंत यासाठी कोणताच उपचार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, सर्वांनी आपल्या आहारामध्ये या आजाराच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आवश्यक गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत.- प्रतीक ठाकूर, गीता द. तटकरे महाविद्यालय, कोलाडकोरोना विषाणूची लागण झालेली आहे, याची कल्पना आल्यावर प्रथम न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालय, रेल्वे स्टेशनवर अशी व्यवस्था नाही. त्यामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. यासाठी मास्कचा वापर करीत आहोत. त्याप्रमाणे शिंकणाऱ्या, खोकणाºया व्यक्तींपासून सावधगिरी बाळगत आहोत.- श्रवण मानकर, गीता द. तटकरे महाविद्यालय, कोलाड‘कोरोना’ हे सध्या संपूर्ण जगासमोर जणू एक मोठे आव्हानच आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये त्यानेथैमान घातले आहे. मात्र सोशल मीडियावर चालणारे जोक्स पाहून कोरोनासंबंधित बाळगाव्या लागणाºया सावधगिरीकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे असे वाटते. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता सर्वप्रथम खोट्या बातम्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरच्या मार्केटिंगला बळी न पडता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फायदेशीर ठरू शकेल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनाला न घाबरता त्याच्या विरोधात स्वरक्षण करून लढा देणे गरजेचे आहे, असे मनापासून वाटते.- पूजा कांबळे, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्लेनवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे. एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला ‘कोरोना व्हायरस’ असे म्हटले जाते. पण यामुळे आपण घाबरण्याचे काही कारण नाही. काळजी आणि खबरदारी घेणे मात्र गरजेचे आहे. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विषाणूचा फैलाव रोखत असतानाच दुसरीकडे अफवांचा फैलाव रोखणेही तितकेच जरूरीचे आहे. बाहेर फिरताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा जेणेकरून व्हायरसचा संपर्क होणार नाही.- विशाल जगदाळे, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणेकोरोना विषाणूची सर्वप्रथम माहिती मिळाली ती डिसेंबर महिन्यात. मात्र, हा विषाणू चीनची सीमा ओलांडून आपल्या भारत देशातही पोहोचला आहे. त्यासाठी आम्ही युवा नागरिकांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करणे, नाक, तोंड, डोळे यांना हात लावणे टाळणे अशा छोट्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. घाबरण्याचे काही कारण नाही.- अमिता सहाणे, बांदोडकर महाविद्यालय, ठाणेबाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, दात घासल्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करून घसा स्वच्छ करणे, काही खाण्याआधी आणि नंतर हात धुणे, हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करणे या सवयी लहानपणापासून लावण्यात येतात. शासन आणि आरोग्य विभागाने आवाहन केल्यानुसार काळजी घेत आहोत. आम्ही सोशल मीडिया हाताळत असताना त्यावर येणारे ‘टाइमपास’ मेसेज आणि उपाययोजना यावर विश्वास ठेवत नाही. प्रसारमाध्यमातील बातम्यांकडेच लक्ष देत असल्याने सद्य:स्थितीबद्दल स्वत: अपडेट राहून इतरांनाही माहिती देतो.- भाग्येश गावंड,एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालय, बोर्डीकोरोनामुळे आज जग हादरले आहे.कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. खोकणाºया व्यक्तीपासून एक मीटर अंतर ठेवणे आवश्यक असून आपण स्वत: खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवल्यास स्वत: इतर व्यक्तींपासून दूर राहणे आणि रुग्णालयात तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शीतपेये टाळावीत. एसीचा वापर टाळल्यास आपले आरोग्य चांगले राहते. मग कोणताही आजार असो, तो नक्कीच दूर राहतो. बाहेरचे अन्नही टाळल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते फलदायी ठरेल. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे.- प्रतीक पाटील, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूरकोरोना व्हायरस या संसर्गजन्य व्हायरसशी लढा हा आपल्यालाच द्यायचा आहे. यासाठी वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली गेली आहे. त्याचा विचार केला तर या भयाण संसर्गजन्य व्हायरसवर आळा घालता येईल असे मला वाटते. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शिक्षण घेणाºया मुलाची त्याच्या आईसमवेत संभाषणाची क्लिप व्हायरल झालेली आहे. सर्वांनी ‘कोरोना'शी निडरपणे लढा द्यावा. प्रत्येकाने आपली काळजी घेतलीपाहिजे.- आदित्य आवारी,सरदार पटेल महाविद्यालयया वर्षाच्या सुरुवातीला कोरोना हा रोग सर्वत्र पसरला आणि जगात हाहाकार माजला. पण तसे बघायला गेले तर आपल्यासाठी कुठला रोग किंवा कुठली साथ ही नवीन नाही. पण तरीसुद्धा आपण योग्य ती काळजी घ्यायला हवीच. जसे की, मास्क लावून बाहेर पडणे असेल, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे असेल अशा बºयाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रशासनाकडून कळविण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. यापासून वाचण्यासाठी सर्वांनी आपल्या आहारामध्ये आवश्यक गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत.- आदित्य नाकती,केळकर महाविद्यालयकोरोनामुळे सारे जग हादरले आहे. आपल्या देशातही काहीसे भीतीचे वातावरण आहे. पण अशी कितीतरी संकटे आपल्या देशावर पर्यायाने नागरिकांवर आली. मात्र परतवून लावण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आपल्या देशातील प्रत्येक नागरिकामध्ये आहे.कोरोनाला न घाबरता त्याच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे,- अचिरा शहा, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूरआज कोरोनाविषयीचे तांडव सर्वत्र माजले असले तरी त्यापासून बचाव करण्याची ताकद आपल्यामध्ये नक्की आहे. सगळ्यात आधी कोरोना व्हायरसबद्दल असे सांगण्यात येत होते की, हा सीफूड मार्केटमधून पसरला. हा व्हायरस दूर करण्याचा कोणताही इलाज सापडलेला नाही. पण लस मिळेपर्यंत काही गोष्टींची काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.- बाळाराम राजभर, सोनूभाऊ बसवंत विद्यालय, शहापूरआज कोरोना या महामारीने साºया जगाला हादरवून सोडले आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आजही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.सोशल मीडियामुळे कोरोनाविषयक अफवांमध्ये कैकपटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे या अफवांचा फैलाव रोखणेही तितकेच जरूरीचे आहे. फ्रीजमधील पदार्थ टाळणे आदी गोष्टी केल्यास कोणताही आजार शिवणार नाही. शक्यतो लग्नसमारंभ, वाढदिवस असे गर्दीचे समारंभ टाळावेत.बाहेर फिरताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा जेणेकरून व्हायरसचा संपर्क होणार नाही.- शुभम् भेरे,सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूरॉ

संकलन- आविष्कार देसाई, जान्हवी मौर्य, अरुणकुमार मेहत्रे, तेजल मोहिते, आशिष राणे़, अनिरुद्ध पाटील, जनार्दन भेरे

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनामहाविद्यालयविद्यार्थी