Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:...तरच भाविकांना सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश; आदेश बांदेकरांनी ठेवली 'अट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 12:27 IST

सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आज याबाबतची माहिती दिली.

मुंबई : साऱ्या महाराष्ट्रात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायकाच्या मंदिरामध्येही कोरोनामुळे बंधने आणण्यात आली आहेत. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी असल्याने मंदिर प्रशासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्य़ास सुरुवात केली आहे. 

सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आज याबाबतची माहिती दिली. राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जत्रा, सोहळे रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटाझर देण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय मंदिर प्रशासन नीट काळजी घेत असून रांगांसाठीचे खांब, आणि फरशी वारंवार निर्जंतूक केली जात आहे. 

महाराष्ट्रात आजपर्यंत 20 जण कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे, मुंबई आणि नागपूरचा प्रामुख्याने समावेश आहे. तर देशभरातील रुग्णांची संख्या 82 वर गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोघेही वरिष्ठ नागरिक होते. 

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाआदेश बांदेकर