Join us  

coronavirus: गर्दी बघून 'शॉक' झाले, सुप्रिया सुळेंचं नागरिकांना भावनिक आवाहन Please...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 1:06 PM

कोरोनाचा धोका असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नवी मुंबईत कळंबोली पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग रोखला आहे

मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तरी पण या सुचनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करीत रोडवर उतरत आहेत. त्याचबरोबर प्रवास करत आहेत. एक दिवसाच्या जनता कर्फ्युनंतर आज पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत आहे. लोक रस्त्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळेच, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन लोकांना घरीच थांबण्याची कळकळीची विनंती केली आहे.

कोरोनाचा धोका असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नवी मुंबईत कळंबोली पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग रोखला आहे. ही सारे लोकं सांगली, सातारा, पुणेच्या गावी जात होते. कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत आहे . तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने नागरिकांना बाहेर न पडण्याचे वारंवार सांगितले जात आहे. रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यास पूर्ण प्रतिसादही मिळाला. रात्री पासून जमावबंदीही लागू करण्यात आली. सोमवारी मात्र सर्व नियम पयदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणा-यांची संख्या वाढत आहे. त्याचमुळे, बातम्यांमधील गर्दी आणि ट्रॅफिक जाम पाहून सुप्रिया सुळेंनी नागरिकांना घरीच बसा, अशी कळकळीची विनंती केली आहे.  

पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि सरकारी कर्चमारी आपल्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, आपण सरकारी सूचनांचं पालन करावे, रोडवर विनाकारण गर्दी करू नये, अशी विनंतीच सुप्रिया सुळेंनी केली आहे. कृपया, कृपया.. सर्वांनीच घरीच बसावे, आपल्या भविष्याच्या सुरक्षितता आणि आरोग्यासाठी  हे नितांत गरजेचं आहे. आपण आपलं स्वत:च आयुष्य वाचवुया, असे सुप्रिया यांनी म्हटले आहे. तसेच, टेलिव्हीजनवर रस्त्यावरील गर्दी पाहून मी शॉक झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकूश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यु टर्न मारावा लागला.

नागरिकांची पोलिसांसोबत हुज्जत 

अत्यावश्यक नागिकांना पुणे महामार्गावरुन एन्ट्री दिली जात आहे. इतर नागरिकांना पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जमलेल्या नागरिकांनी वाहने सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तरी देखील पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त लावला आहे. पुण्याकडे कोणतीही गाडी सोडण्यात येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :सुप्रिया सुळेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसट्विटरमुंबई