Join us  

coronavirus: रुग्णवाहिकांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करा, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 5:53 AM

मुंबई : कोरोनासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतानाच राज्य सरकारने विविध ठिकाणी जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत. ...

मुंबई : कोरोनासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतानाच राज्य सरकारने विविध ठिकाणी जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत. या केंद्रांवरही चांगले उपचार मिळतात, याचा विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, मुंबईतील रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.मुंबई पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेमलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाºयांसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त आय.एस. चहल, मुंबई पालिकेत विशेष नियुक्त प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले, खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी आता कमी झाल्या आहेत. काही अधिकाºयांवर पालिका रुग्णालयांची सोपविलेली जबाबदारी यामुळे कामात सुसूत्रता येतानाच रुग्णांना बेड मिळत आहेत. ज्या खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत अशा रुग्णालयांनी सध्या किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, किती बेड रिक्त आहेत, याची यादी रुग्णालयाच्या दरवाजावर लावावी, अशी सूचना केली. रुग्णवाहिकांनाही मार्गदर्शन करावे, म्हणजे कुठल्या रुग्णालयात बेड रिक्त आहेत याची त्यांना माहिती मिळू शकेल. मुंबईत काही खासगी संस्थांनीही रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत. त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार केल्यास नागरिकांना सेवा मिळू शकेल, अशा सूचना त्यांनी केल्या.‘मुंबई कोरोनामुक्त करणे, हेच लक्ष्य हवे’मुंबईतील छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांना सेवा मिळेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोनाविरुद्धचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असे समजून जिंकण्यासाठी पावले उचलावीत आणि मुंबई कोरोनामुक्त होईल, हे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईउद्धव ठाकरे