coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पाचवा बळी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 07:31 IST2020-05-14T07:31:26+5:302020-05-14T07:31:48+5:30

मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षीय पोलिसांना सुट्टी देण्यात आल्याने संबंधित उपनिरीक्षकही सुट्टीवर होते. ते नवी मुंबईत पत्नीसोबत राहायचे.

coronavirus: Corona's fifth victim in Mumbai police force | coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पाचवा बळी  

coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पाचवा बळी  

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील पोलीस दलात कोरोनाने पाचवा बळी घेतला आहे. शिवडी पोलीस ठाण्यातील ५५ वर्षीय सहायक उपनिरीक्षकांचा मंगळवारी रात्री कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबई पोलीस दलातील ५५ वर्षीय पोलिसांना सुट्टी देण्यात आल्याने संबंधित उपनिरीक्षकही सुट्टीवर होते. ते नवी मुंबईत पत्नीसोबत राहायचे. मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. तब्येत बिघडल्याने जवळच्या पालिका रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. तेथे चाचणीअंती त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांची संख्या आठ झाली असून १२४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: coronavirus: Corona's fifth victim in Mumbai police force