CoronaVirus News: मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:52 AM2020-08-14T03:52:15+5:302020-08-14T06:49:24+5:30

मुंबईत १२ ऑगस्टपर्यंत कोविडच्या ६ लाख २९ हजार ८९९ चाचण्या झाल्या. मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णनोंदीत वाढ झाली आहे. दिवसभरात १२०० रुग्ण आढळले असून ४८ मृत्यू झाले आहेत.

CoronaVirus corona patient doubling rate reaches to 87 days | CoronaVirus News: मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर

CoronaVirus News: मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर

Next

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर गेला आहे. ६ ते १२ आॅगस्टपर्यंत शहर, उपनगरात एकूण कोविडवाढीचा दर ०.८० टक्के आहे.

मुंबईत १२ ऑगस्टपर्यंत कोविडच्या ६ लाख २९ हजार ८९९ चाचण्या झाल्या. मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णनोंदीत वाढ झाली आहे. दिवसभरात १२०० रुग्ण आढळले असून ४८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ५५६ झाली असून बळींचा आकडा ६ हजार ९९१ झाला आहे. मुंबईत १ लाख ९५४ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या १९,३१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ४८ मृत्यूंमधील ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३० रुग्ण पुरुष व १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी चार जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ३५ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते, तर उर्वरित नऊ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.

Web Title: CoronaVirus corona patient doubling rate reaches to 87 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.