Join us  

coronavirus: मास्क विक्रीविषयी संभ्रम : ग्राहकांची लूट, सर्वसामान्य नियमांबाबत अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 2:51 AM

Mask Price News : केवळ विक्रेतेच नव्हे तर सामान्य ग्राहकांनाही मास्कच्या किमतीविषयी जागरूकता नाही. त्यामुळे आवश्यकता असल्याने मिळेल त्या दरात हे मास्क खरेदी करीत  आहेत. मास्कच्या दरांविषयी, दर्जाविषयी तक्रार करण्याबद्दलही ग्राहकांना माहिती नसल्याचे दिसून आले.

- स्नेहा मोरे मुंबई : मास्कच्या किमतीवर सरकारने चाप लावल्याने मास्क विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना काळात मोठी उलाढाल असलेल्या मास्कच्या बाजारपेठेचे भाव कडाडल्यामुळे आता विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. किमती कमी करूनही सरकारच्या निर्देशांना केराची टोपली दाखवत ग्राहकांची लूट सुरू असल्याचे दिसते.  केवळ विक्रेतेच नव्हे तर सामान्य ग्राहकांनाही मास्कच्या किमतीविषयी जागरूकता नाही. त्यामुळे आवश्यकता असल्याने मिळेल त्या दरात हे मास्क खरेदी करीत  आहेत. मास्कच्या दरांविषयी, दर्जाविषयी तक्रार करण्याबद्दलही ग्राहकांना माहिती नसल्याचे दिसून आले. दर्शनी भागात फलक नाहीलाईफ संजीवनी, दवाबाजार आणि  जयसाई या तीन दुकानांमध्ये मास्कच्या किमती विचारल्या असता, तिन्ही दुकानांमध्ये दर्शनी भागात दर फलक दिसले नाहीत. या ठिकाणी एन-९५ मास्कचा तुटवडा दिसून आल्याचे दिसून आले. तर तीन व चार पदरी मास्कची विक्री अधिक होत असून यांच्या किमती १०-१२ रुपयांच्या पुढे असल्याचेही दिसून आले. तर एन-९५ मास्कची उपलब्धता नसली तरी याची किंमत ५०-७५ रुपयांच्या पुढे असल्याचे आढळले.सॅनिटायझरचे दर झाले कमी विविध प्रकारच्या एन-९५ मास्क १९ ते ४० व साधे दुपदरी तीन पदरी मास्कची तीन ते चार रुपये दराने विक्री करण्यात येत आहेत. विविध दर्जानुसार एन-९५ मास्कची किंमत १६ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध आहे. पूर्वी हेच मास्क जास्त दराने विकले जात होते; मात्र आता मास्क आणि सॅनिटायझरचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती सर्जिकल हेल्थ केअरचे राकेश शाह यांनी सांगितले.  स्थानिक औषध विक्रेत्यांची बैठक झाली होती. मास्कचा तुटवडाजेजे परिसरातील औषध विक्रेत्यांच्या दुकानात सर्रास ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून आले आहे. या दुकानांमध्ये १९ ते ४९ रुपयांचे मास्क ५० रुपयांच्या पुढे मिळत आहेत. तर बऱ्याच दुकानांमध्ये एन-९५ मास्कचा तुटवडा असल्याचे दिसून आले आहे. जीवन मेडिकल, लाईफ केअर मेडिकल आणि दवा दुकान या दुकानांमध्ये मास्कच्या किमतीचा दर्शनी फलक दिसून आला नाही. शिवाय, या विक्रेत्यांनी एन-९५ मास्क हवे असल्यास आधी कळवून मग पुरवठा होतो.  

विक्रेते एफडीएच्या रडारवरमास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमांतून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिक दराने मास्क व सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एफडीएची नजर असून यासंबंधी सामान्यांनीही तक्रार करावी.    - सुनील भारद्वाज,     सहआयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईआरोग्य