CoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:40 PM2020-03-31T21:40:18+5:302020-03-31T21:41:03+5:30

कोरोनाचे देशावर आलेले संकट लवकर दूर कर अशी घरातच प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनी केली.

CoronaVirus celebrating the girl's birthday not celebrated; gave 2 Cleaning machine | CoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन

CoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन

Next

मनोहर कुंभेजकर
मुंबई : सध्या देशावर आलेल्या कोरोनाचे संकट आणि राज्यात असलेली संचारबंदी लक्षात घेता मढच्या लोबो कुटुंबाची सामाजिक बांधिलकी दाखवत त्यांचा जुलिआ या ४ वर्षाच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही. उलट कन्येच्या वाढदिवसाला येणाऱ्या खर्चातून जेफरी लोबो व ख्रिश्चना लोबो यांनी मढ ग्रामस्थांना येथील परिसर व चिंचोळ्या गल्ल्या स्वच्छ करण्यासाठी २ स्वच्छता मशिन्स आणि फवारणी करण्यासाठी प्रत्येकी ३५ लिटरचे दोन सॅनिटायझरचे कॅन भेट म्हणून दिले.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सध्या मढ मध्ये कौतूक होत आहे. यावेळी कोरोनाचे देशावर आलेले संकट लवकर दूर कर अशी घरातच प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनी केली.

राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व येथील काँग्रेसचे स्थानिक आमदार जरी मुंबई शहराचे पालक मंत्री असले तरी त्यांचे बारीक लक्ष मढ वर देखिल आहे. त्यांच्या मदतीने मढ बेट आणि आसपासच्या भागात जोमानेे सच्छता सुरू आहे.मात्र मोठ्या मशीन्स असल्याने आणि येेेथील काही   गल्ल्या चिंचोळ्या असल्याने आम्ही त्या स्वच्छ करू शकलो नाही.आमची अडचण लक्षात आली.

जेफ्री लोबो यांची कन्येचा वाढदिवसाच्या या शुभ दिवशी त्यांनी आम्हाला मढ बेट आणि सभोवतालच्या भागात स्वच्छता करण्यासाठी दोन स्वच्छता मशीन्स आणि दोन मोठे सॅनिटायझरचे कॅन भेट म्हणून दिले.त्यांच्या या सामाजिक बांधिलकी बद्धल आम्ही लोबो कुटुंबाचे आभारी आहोत.सदर मशीन्स चार्ज झाल्यावर येथील स्वच्छतेचे काम लवकरच जोमाने सुरू होईल अशी माहिती अ‍ॅड.विक्रम कपूर यांनी लोकमतला दिली.

Web Title: CoronaVirus celebrating the girl's birthday not celebrated; gave 2 Cleaning machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.