Join us  

Coronavirus: ठाकरे सरकारचा कोट्यवधीचा घोटाळा, कंत्राटदार मालामाल; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:09 AM

काही पूर्व उपनगरात १७२ रुपये, दादर परिसरात ३७२ रुपये, पश्चिम उपनगरात ३५० रुपये, ठाणे ४१५ रुपये कंत्राटदाराला दिले जातात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाचं जेवण, वेळेवर मिळत नाही, पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाहीजेवण, नाश्ता देण्याबाबत आदेश महापालिकेने आणि राज्य सरकारने काढले आहेतसत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्येच आपापल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्याची स्पर्धा

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना भाजपाकडून राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये विविध कंत्राटदारांना वेगवेगळे दर आकारण्यात आले असून यातून ठाकरे सरकारवर कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याबाबत किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. किरीट सोमय्या म्हणतात की, वरळी, धारावी, पवई, चांदिवली, शिवाजीनगर, कांदिवली अशा अनेक कोरोना क्वारंटाईन केंद्राची मी भेट घेतली आणि पीडितांची व्यथा जाणून घेतली. कोरोनाग्रस्ताला विलगीकरण कक्षात १०-१४ दिवस ठेवण्यात येते याठिकाणी देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत अनेक तक्रारी आहेत. निकृष्ट दर्जाचं जेवण, वेळेवर मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही. सरकारकडून नियमानुसार दिवसातून दोनदा जेवण, सकाळी नाश्ता, दुपारी चहा अशी व्यवस्था कंत्राटदारामार्फत केली जाते. वार्ड स्तरावर हे कंत्राट दिलं जात आहे असं ते म्हणाले.

प्रत्येक विलगीकरण केंद्रात सारखं जेवण, नाश्ता देण्याबाबत आदेश महापालिकेने आणि राज्य सरकारने काढले आहेत. परंतु कंत्राट प्रत्येक वार्डनुसार दिलं जातात. खाण्याच्या पदार्थाचा दर्जा आणि संख्या सारखीच पण दरदिवसा प्रतिव्यक्ती वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळे पैसे दिले जातात. काही पूर्व उपनगरात १७२ रुपये, दादर परिसरात ३७२ रुपये, पश्चिम उपनगरात ३५० रुपये, ठाणे ४१५ रुपये कंत्राटदाराला दिले जातात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच रोज किंवा दोन-तीन दिवसांनी कंत्राट दिले जाते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्येच आपापल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्याची स्पर्धा सुरु आहे. कंत्राट देण्यावरुन वार्ड कार्यालयात भांडण होतात. दोन दिवसांपूर्वी अशाच भांडणामुळे पवई क्वारंटाईनमध्ये १४०० लोकांना जेवणही मिळालं नाही. दोन वेळचे जेवण, नाश्ता याची किंमत १०० रुपयेपेक्षा जास्त नाही. परंतु कंत्राटदाराला कुठे १७२, ३५०, ३७२ तर कुठे ४१५ रुपये दिले जातात. रोज १ लाख लोकांच्या खाण्याची ऑर्डर कंत्राटदाराला देण्यात येते. महिन्याची उलाढाल १०० कोटींहून अधिक रुपयांची असून ६ महिने विलगीकरण केंद्र चालली तर शेकडो कोटींची उलाढाल आणि घोटाळा होणार असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भाजपाच्या माजी खासदाराची वेगळ्या राज्याची मागणी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

‘या’ मास्कच्या संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार; संशोधनाला मिळणार यश?

देशांतर्गत विमानसेवेची सोमवारपासून भरारी, केंद्राची घोषणा

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

 

 

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकिरीट सोमय्या