मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिग पाळण्याचे, मास्क घालण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र असे असले तरी लोकांमधील कोरोनाबाबचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे. बरेच जण मास्कशिवाय फिरताना दिसतात. दरम्यान, आज मुंबईमध्ये काही तरुणांनी अँटी मास्क आंदोलन केले.मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित झाले. यामध्ये मास्क वापरण्याची सक्ती हटवण्याची मागणी करत अनेकजण सहभागी झाले होते. या तरुणांच्या हातात मास्क आणि लॉकडाऊनच्या विरोधातील घोषणा लिहिलेले पोस्टर्स घेऊन अनेक तरुण मरिन ड्राइव्ह येथे गोळा झाले होते. मास्कममुळे कॅन्सर होतो. तसेच सतत मास्क घालून श्वास घेता येत नाही, असा दावा या आंदोलनकर्त्यांकडून केला जात होता.
coronavirus: मुंबईत झाले अँटी मास्क आंदोलन, लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची मागणी
By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 18:32 IST
Anti-mask agitation in Mumbai News : मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित झाले. यामध्ये मास्क वापरण्याची सक्ती हटवण्याची मागणी करत अनेकजण सहभागी झाले होते.
coronavirus: मुंबईत झाले अँटी मास्क आंदोलन, लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची मागणी
ठळक मुद्देकोरोनाचा धोका कायम असला तरी लोकांमधील कोरोनाबाबचे गांभीर्य कमी होताना दिसत आहेआज मुंबईमध्ये काही तरुणांनी अँटी मास्क आंदोलन केलेआंदोलनकर्त्यांनी मास्कची सक्ती आणि लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची केली मागणी