CoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 04:58 IST2020-06-26T04:58:26+5:302020-06-26T04:58:48+5:30

या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील कालावधीतील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

CoronaVirus: Another 58 people lost their lives due to corona in Mumbai | CoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीव

CoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीव

मुंबई : मुंबईत गुरुवारी १ हजार ३६५ रुग्णांचे निदान झाले असून ५८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा आकडा ७० हजार ७८७ झाला असून आतापर्यंत ४ हजार ६२ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अन्य कारणांमुळे आठ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या मुंबईत २७ हजार ६५९ एवढे कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत ३९ हजार १४९ जण उपचाराअंती कोविडमुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्के झाले आहे.
मुंबईत गुरुवारी एकूण ५८ मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील कालावधीतील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: Another 58 people lost their lives due to corona in Mumbai