Join us  

Coronavirus:...आणि प्रवाशांचा प्रवास झाला ‘बेस्ट’; गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांसाठीही घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:23 AM

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या.

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी अवघ्या जगासोबत धावणारी मुंबापुरी बंद झाली. मात्र लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी रस्त्यावर धावली ती मुंबईचीबेस्ट बस. या बेस्ट बसने अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला सेवा दिली. नेहमीच्या तुलनेत रस्त्यांवर धावणाºया बेस्ट गाड्यांची संख्या कोरोनामुळे घटलीही असेल. मात्र याच बेस्ट बसने अत्यावश्यक सेवेतल्या प्रत्येकाला घरापासून कामावर आणि कामापासून घरापर्यंत सोडण्याचे काम चोख बजावले. एवढेच नाही तर आपापल्या मूळ गावी परतणाºया मजुरांच्या हाकेलाही बेस्ट बस धावली.

मुंबई शहर आणि उपनगरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर येथील सर्वच वाहतूक व्यवस्था बंद पडली. लोकल बंद पडल्याने मुंबईचा कणाच मोडला. मात्र बेस्टने मुंबईला सावरले. अत्यावश्यक सेवेसाठी धावून गेलेली बेस्ट बस कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठीच्या प्रवासातही कामी आली. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत धावणाºया बेस्ट बसने मुंबईला आधार दिला. पुन:श्च हरिओमअंतर्गत ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, बेस्टच्या बसगाड्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरिता असणाºया प्रत्येक आसनावर केवळ एक एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो, अशी वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करू लागले. तत्पूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट धावत होती.

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या. जे प्रवासी मुंबईच्या बाहेरून प्रवास करत मुंबईत दाखल होत आहेत; त्यांच्यासाठी विरार ते मालवणी, नालासोपारा ते गोरेगाव, नालासोपारा ते पोयसर, बदलापूर ते सायन, कल्याण ते सायन, पनवेल ते सायन अशा बेस्ट बसगाड्या धावू लागल्या.मजुरांसाठीही ‘बेस्ट’मजुरांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे पोलिसांच्या मागणीनुसार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिकीट भाडे आकारणी बंद करण्यात आली. मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क करण्यात आला.

टॅग्स :बेस्टमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस