Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘गर्भवती महिलांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 02:26 IST

कोविड-१९चा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहोचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही.

मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-१९चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने अ‍ॅड. ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, कोविड-१९चा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहोचू नये यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही.५०पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस व श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोविड संसर्गातून धोकादायक स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करूदेण्याच्या पर्यायावर विचार व्हावा. तसेच घरातून काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई