Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: एसी लोकल बंद करणार; ठाणे-वाशी लोकलसेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:48 IST

एसी लोकलमधील थंड हवेमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे.

मुंबई, ठाणे : कोरोना व्हायरसमुळे पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकल काही काळासाठी बंद करण्यात येणार आहेत. यामुळे पनवेल-ठाणे मार्गावर धावणारी एसी लोकलही बंद होण्याची शक्यता आहे. तर ठाणे-वाशी लोकलसेवा ठप्प झाली असून लोकलच्या रांगा लागल्या आहेत. 

एसी लोकलमधील थंड हवेमुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे. यामुळे या एसी लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ साध्या लोकलच सुरु राहणार आहेत. मात्र, या लोकल ट्रेनही 50 टक्केच प्रवाशी असतील अशा चालविल्या जाणार आहेत. यामुळे कदाचित काही लोकल रद्द करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ठाणे-वाशी मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या असून बऱ्याच वेळापासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर गाड्या उभ्या आहेत. तर दोन लोकल ठाणे स्थानकाजवळ रुळांवर थांबलेल्या आहेत. प्रवाशांनी रुळांवर उड्या टाकून चालत जाणे पसंद केले आहे. अचानक ब्लॅाक घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. अर्ध्यातासाने वाहतूक सुरु झाली आहे. कालही अचानक अर्धा तास ब्लॉक घेतला होता.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसएसी लोकलपश्चिम रेल्वेठाणे