Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यात ९५.२६% रुग्ण काेराेनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 04:34 IST

coronavirus: राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ४३ हजार ७०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी १ हजार ९४८ रुग्ण आणि २७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २० लाख २८ हजार ३४७ झाली असून बळींचा आकडा ५१,१०९ झाला आहे. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या