Join us  

Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 9:12 PM

Coronavirus in Maharashtra: राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - एकीकडे देशातील कोरोनाचा संसर्ग भयानक वेगाने वाढत असताना महाराष्ट्रातून मात्र आज मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. (Coronavirus in Maharashtra) राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ वर पोहोचली आहे.  (82,000 patients recovered from coronavirus in the Maharashtra today, 53,605 new patients reports today)

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाही सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. मात्र आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ५० लाख ५३ हजार ३३६ एवढी झाली आहे. तर सकारात्मक बाब म्हणजे आज राज्यात ८२ हजार २६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७५ हजार २७७ एवढी झाली आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचे ६ लाख २८ हजार २१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  

दरम्यान, मुंबईमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येल लक्षणीय घट झाली असून, मुंबईत आज कोरोनाच्या २ हजार ६७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर ३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे ४८ हजार ४८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.   

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमहाराष्ट्र