CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात कोरोनाचे आणखी ६९ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 04:27 IST2020-06-14T04:27:41+5:302020-06-14T04:27:54+5:30
दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६९ रुग्णांपैकी ४७ रुग्णांना दीर्घकालीन आजार

CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात कोरोनाचे आणखी ६९ बळी
मुंबई : मुंबईत शनिवारी ६९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे.
शनिवारी दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६९ रुग्णांपैकी ४७ रुग्णांना दीर्घकालीन आजार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. यातील ४७ रुग्ण पुरुष, तर २२ महिला होत्या. ७ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. ३७ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. २५ रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होते.
पालिकेच्या विविध रुग्णालयात शनिवारी भरती करण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांचा आकडा ७८८ आहे. बाधित रुग्ण १ हजार ३८३ असून ७९५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर उपचारासाठी पालिका प्रशासनासह आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.